विजय माल्ल्या ४ हजार कोटी परत करणार

उद्योगपती विजय माल्या आणि किंगशर एयरलाईन्सने सुप्रीम कोर्टात, ४ हजार कोटी रूपये सप्टेंबरपर्यंत परत करणार असल्याचं सांगितलं आहे. विजय माल्ल्यावर बँकांचं एकूण ९ हजार कोटी रूपये कर्ज आहे. 

Updated: Mar 30, 2016, 03:38 PM IST
विजय माल्ल्या ४ हजार कोटी परत करणार title=

नवी दिल्ली : उद्योगपती विजय माल्या आणि किंगशर एयरलाईन्सने सुप्रीम कोर्टात, ४ हजार कोटी रूपये सप्टेंबरपर्यंत परत करणार असल्याचं सांगितलं आहे. विजय माल्ल्यावर बँकांचं एकूण ९ हजार कोटी रूपये कर्ज आहे. 

विजय माल्ल्या सध्या परदेशात वास्तव्य करत आहे. मी पळालेलो नसल्याचं विजय माल्ल्या ट्वीट करून सांगत असतो.

माल्या यांनी ट्वीट करून सांगितलं आहे, मी आंतरराष्ट्रीय उद्योजक आहे, मी भारतात येऊन जाऊन असतो, मी भारतातून पळालेलो नाही. बँकांनी कर्ज वसुलीसाठी टिब्यूनलमध्ये कर्ज न चुकव्याने, माल्याविरोधात कारवाईची मागणी केली होती.