जमशेदजी टाटांचं स्वप्न सत्यात; 'विस्तारा' आकाशात!

टाटा उद्योग समूहाची 'विस्तारा एअरलाइन्स' सेवा आजपासून सुरु झालीय. 'विस्तारा' हा टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा संयुक्त प्रकल्प आहे.

Updated: Jan 10, 2015, 12:33 PM IST
जमशेदजी टाटांचं स्वप्न सत्यात; 'विस्तारा' आकाशात! title=

नवी दिल्ली : टाटा उद्योग समूहाची 'विस्तारा एअरलाइन्स' सेवा आजपासून सुरु झालीय. 'विस्तारा' हा टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा संयुक्त प्रकल्प आहे.

दिल्लीहून मुंबईसाठी टाटा विस्ताराच्या पहिलं प्लेननं टेक ऑफ  घेतलं. सुरुवातीला विस्ताराकडे दोन ए-320 विमानं असतील. शनिवारपासून विस्ताराच्या दररोज १४ फ्लाईटस उड्डाण घेतील. विस्तारा सध्या तीन ए३२० -२०० विमानांसोबत केवळ तीन जागांहून उड्डाण घेतेय. विस्तारा पुन्हा एकदा डोमेस्टिक एअरलाईन्सच्या बाजारात प्रीमियम इकोनॉमी क्लास आणतंय. 

विश्लेषकांच्या मते, किंगफिशरनं दम तोडल्यानंतर बिझनेस क्लासचं भाडं खूप वाढलंय. इकोनॉमी क्लासच्या तुलनेनं बिझनेस क्लासचं तिकीट आज पाच टक्के जास्त आहे. येत्या पाच वर्षात २० विमानं आणण्याची कंपनीची योजना आहे.. फ्लाइट बुकिंगसाठी विस्ताराला चांगला प्रतिसाद मिळलाय. विस्तारा एअरलाइन्सनं ग्राहकांसाठी लॉयल्टी कार्यक्रम सुद्धा ठेवलाय.

जवळपास ६० वर्षांनंतर टाटा ग्रुप देशात आपली एअरलाईन्स सुरु करण्याचं स्वप्न सत्त्यात उतरवत आहे. हे स्वप्न होतं जमशेदजी टाटांचं... त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रतन टाटांनी भरपूर मेहनत घेतली पण, तेदेखील हे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. परंतु, आता मात्र हे स्वप्न सत्यात आलंय. 

'विस्तारा'च्या एन्ट्रीमुळे भारतीय एअरलाईन्स इंडस्ट्रीमध्ये काही बदलाव पाहायला मिळतोय का हे पाहणं सगळ्यांसाठीच औत्सुक्याचं ठरलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.