खुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात

 दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे. 

Updated: Apr 30, 2015, 07:46 PM IST
खुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात title=

नवी दिल्ली :  दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे. 

व्होडाफोन इंडियाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) आदेशानुसार रोमिंगमध्ये लोकल एसएमएससाठी ग्राहकांना २५ पैसे द्यावे लागतील आतापर्यंत एक रूपया द्यावा लागत होता. तसेच एसटीडी एसएमएससाठी ३८ पैसे द्यावे लागतील, यापूर्वी १.५० पैसे द्यावे लागत होते. 

व्होडाफोन इंडियाच्या ग्राहकांना आपल्या होम नेटवर्कच्या बाहेर कॉल रिसिव्ह करण्यासाठी ४५ पैसे प्रति मिनिट द्यावे लागणार आहे. यापूर्वी ७५ पैसे प्रति मिनिट असा दर होता. त्यानुसार आता आउट गोइंग कॉल आणि एसटीडी कॉल क्रमशः ८० पैसे आणि १.१५ पैसे प्रति मिनिट द्यावे लागणार आहे. यापूर्वी हा दर एक रूपया आणि दीड रुपया होते. या शिवाय कंपनीने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी विशेष रोमिंग शुल्क योजना सुरू केली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.