www.24taas.com,नवी दिल्ली
भारताच्या इतिहासात फासावर चढणारा पहिला विदेशी नागरिक अजमल कसाब ठरला आहे. कसाबने मुंबईत दहशतवादी हल्ला करून कित्येक निरअपराध लोकांचे बळी घेतले होते. त्याला पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आले.
२६/११ या मुंबई हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात सकाळी ७.३० वाजता फाशी देण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे देशभर आनंद साजरा करण्यात येत आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात फाशी देण्यात आलेला कसाब हा पहिला परदेशी नागरिक आहे. देशात आता पर्यंत ५५ लोकांना फाशी देण्यात आली आहे. यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकही परदेशी व्यक्ती नाही, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील के. टी. एस. तुलसी यांनी दिली.
कसाबने भारतात येऊन अपराध केला आहे. तसेच त्याने भारतात प्रवेश करताना अवैध मार्गांचा अवलंब केला. त्याच्याशी पाकिस्तानने संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्याचा शव घेण्यास त्याचे कुटुंबही पुढे आलेले नाही, असे ते म्हणाले.
कसाबला पुण्यात सकाळी फाशी देण्यात आली. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. ही बातमी समजेपर्यंत त्याचे जेलचा परिसरात दफनही केले गेले. याचा अर्थ पुण्यातील कब्रस्तानात दफन करण्याचा नकार मिळाल्याचे समजते, वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.