अपर्णा यादव यांची पंतप्रधान मोदींकडे सर्जिकल स्टाईकची मागणी

पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाचं वातावरण आहे. प्रत्येक जण पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचं बोवतंय. यामध्ये आता मुलायम सिंह यादव यांच्या लहान सुनेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Oct 30, 2016, 06:18 PM IST
अपर्णा यादव यांची पंतप्रधान मोदींकडे सर्जिकल स्टाईकची मागणी  title=

लखनऊ : पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाचं वातावरण आहे. प्रत्येक जण पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचं बोवतंय. यामध्ये आता मुलायम सिंह यादव यांच्या लहान सुनेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

अपर्णा यादव यांनी पंतप्रधान मोदींना पाकिस्तान विरोधात आणखी सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी केली आहे. अर्पणा यादव यांच्यामते सर्जिकल स्ट्राइकनेच पाकिस्तानला धडा शिकवता येईल. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. जर सीमेवर पाकिस्तान अशाच प्रकारे कारवाया करत असेल त्याला धडा शिकवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अपर्णा यादव २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्या लखनऊमधून सपाच्या उमेदवार असणार आहेत. २६ वर्षाच्या अपर्णा यादव यांनी इंग्लंडमधील मॅनचेस्टर यूनिवर्सिटीमधून पोस्ट ग्रॅजुएशन केलं आहे. त्यांनी अनेकदा पंतप्रधान मोदींचं कौतूक देखील केलं आहे.