पश्चिम बंगालचं नामांतर, बंगाल नावाला विधानसभेची मंजुरी

पश्चिम बंगालच्या नामांतराचा प्रस्ताव राज्याच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आला.

Updated: Aug 29, 2016, 03:42 PM IST
पश्चिम बंगालचं नामांतर, बंगाल नावाला विधानसभेची मंजुरी title=

कोलकाता : पश्चिम बंगालच्या नामांतराचा प्रस्ताव राज्याच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आला. 'बंगाल' हे आता पश्चिम बंगालचं नवीन नाव असेल. विधानसभेमध्ये पारित झालेला हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. 

बंगालच्या विधानसभेमध्ये 'बंगो' या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला, पण हा प्रस्ताव पारित झाला नाही. पारित झालेल्या प्रस्तावानुसार बांग्ला भाषेमध्ये 'बांग्ला', इंग्रजीमध्ये बेंगाल आणि हिंदीमध्ये बंगाल असं या राज्याचं नाव असेल.