पाहा मुलायम यांनी मोदींच्या कानात काय म्हटलं ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथ ग्रहण समारोहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट झाली तेव्हा मुलायम सिंह यांनी मोदींच्या कानात काहीतरी म्हटलं. त्यानंतर यावर चर्चा रंगू लागल्या.

Updated: Mar 23, 2017, 01:43 PM IST
पाहा मुलायम यांनी मोदींच्या कानात काय म्हटलं ? title=

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथ ग्रहण समारोहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट झाली तेव्हा मुलायम सिंह यांनी मोदींच्या कानात काहीतरी म्हटलं. त्यानंतर यावर चर्चा रंगू लागल्या.

टेलीग्राफने दिलेल्या बातमीनुसार एका भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार मुलायम सिंह यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात म्हटलं की, थोडं अखिलेश यादवचीही काळजी घ्या यांना पण शिकवा. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखिलेशच्या खांद्यावर हात ठेवला.

योगी आदित्यनाथ यांच्या शपथग्रहण समारोहात अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव, एनडी तिवारी यांच्यासह इतर पक्षांचे नेते देखील स्टेजवर उपस्थित होते.