बसस्टॅण्डवरील टीव्हीवर अचानक पॉर्न व्हिडीओ दिसतो, तेव्हा...

केरळातील वायानंद जिल्ह्यातील बसस्थानकावर अचानक असा प्रकार घडेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं, या बसस्थानकावर काही टीव्ही स्क्रिन लावण्यात आले आहेत. यावर जाहिराती सुरू असतात मात्र अचानक या टीव्हीवर पॉर्न व्हिडीओ दिसू लागला. 

Updated: Jun 18, 2015, 03:19 PM IST
बसस्टॅण्डवरील टीव्हीवर अचानक पॉर्न व्हिडीओ दिसतो, तेव्हा... title=

तिरूवअनंतपुरम : केरळातील वायानंद जिल्ह्यातील बसस्थानकावर अचानक असा प्रकार घडेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं, या बसस्थानकावर काही टीव्ही स्क्रिन लावण्यात आले आहेत. यावर जाहिराती सुरू असतात मात्र अचानक या टीव्हीवर पॉर्न व्हिडीओ दिसू लागला. 

सुरूवातीला लोकांना हे विचित्र वाटलं मात्र त्यानंतर आरडाओरड होण्यास सुरूवात झाली, या जाहिराती स्थानिक केबल ऑपरेटरकडून प्रसारीत होतात. या केबल ऑपरेटरने चुकून पॉर्न व्हिडीओ टाकल्याने सर्वत्र बोंबाबोंब झाली. लाजीरवाणी स्थिती झाल्याने, अनेक महिला प्रवाशांना बसस्थानकाबाहेर जाऊन उभं रहावं लागलं.

एका न्यूज साईटने दिलेल्या माहितीनुसार, केबल ऑपरेटरला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.