www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
दहशतवादी यासिन भटकळ, ज्याला नेपाळ पोलीस, एनआयए आणि कर्नाटक स्पेशल टास्क फोर्सनं संयुक्तरित्या पकडलं. तो यासिन भटकळ ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.
> भारतात घडवून आणलेल्या अनेक बॉम्बस्फोटांमध्ये भटकळचा हात आहे. त्यातलाच एक ७ सप्टेंबर २०११ला दिल्लीतल्या हायकोर्टाबाहेर झालेला बॉम्बस्फोटाचा समावेश आहे. ज्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.
> पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातलाही तो एक आरोपी आहे. या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५६ जण जखमी झाले होते.
> १ ऑगस्ट २०१२ला पुण्यातल्या जंगली महाराज रोडवर झालेल्या स्फोटातही यासिन भटकळचा हात असल्याचा संशय आहे. या स्फोटात १ जण जखमी झाला होता.
> भटकळ एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमधला एक दहशतवादी.
> यासिन भटकळचं खरं नाव सय्यद अहमद झरार सिद्धीबप्पा असून त्यानं कर्नाटक इथून इंजिनिअरची पदवी घेतलेली आहे.
> भटकळला एकदा अटक झाली होती. मात्र तो जामीनावर पळ काढला. दोन-तीन वेळा त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.
> भारतातल्या शेकडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला यासिन भटकळ २००८मध्ये अटक होण्यापासून बचावला. कारण त्याच्याविषयी माहिती उपलब्ध नव्हती.
> तसंच गुप्तचर विभाग, दिल्ली पोलीस आणि चेन्नई पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमनं नोव्हेंबर 2011मध्ये चेन्नईतल्या सेलैयूर इथं 9 वर्षीय अब्दुल रहमानच्या घरी छापा टाकला. मात्र त्याच्या काही तास आधीच यासिन भटकळ तिथून फरार झाला होता.
> मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रियाज भटकळ आणि इक्बाल भटकळ या भटकळ बंधूंचा यासीन हा चुलत भाऊ आहे.
> रियाज भटकळ हा इंडियन मुजाहिद्दीनचा एक संस्थापक सदस्य आहे. त्याची जबाबदारी लढण्यासाठी साहित्य उभारण्याची आहे. तो सध्या पाकिस्तानच्या कराची इथं पाकिस्तान सैन्याच्या संरक्षणाखाली राहतोय.
> तर इक्बाव भटकळ हा रियाज भटकळचा भाऊ असून तो सुद्धा इंडियन मुजाहिद्दीनचा एक संस्थापक सदस्य आहे. भटकळ बंधू हे कर्नाटकातले आहेत. इक्बाल भटकळवर आधी गुजरातला मॉड्यूल स्थापित करण्याची जबाबदारी होती. मात्र आता तो ही रियाज सोबत कराचीत आहे.
> अनेक वेळा तुरी देवून पसार झालेला दहशतवादी यासिन भटकळला अटक होणं, ही भारतासाठी चांगली बाब आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.