खूर्चीचा किस्सा: जिथे-जिथे जयललिता तिथे त्यांची खूर्ची

राजकारणात नेत्यांचं आपल्या खूर्चीवर किती प्रेम असतं हे आपल्याला माहितीय. अनेक नेते असे आहेत की जे एकदा खूर्चीवर बसले की उठायचं नाव घेत नाहीत. मात्र आम्ही अशा राजकीय खूर्चीबद्दल सांगतोय, ज्यात थोडा ट्वीस्ट आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 11, 2014, 03:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राजकारणात नेत्यांचं आपल्या खूर्चीवर किती प्रेम असतं हे आपल्याला माहितीय. अनेक नेते असे आहेत की जे एकदा खूर्चीवर बसले की उठायचं नाव घेत नाहीत. मात्र आम्ही अशा राजकीय खूर्चीबद्दल सांगतोय, ज्यात थोडा ट्वीस्ट आहे. कारण इथं खूर्ची ही राजकारणाची म्हणून नाही तर मजबूरी म्हणून वापरली जातेय आणि या खूर्चीवर बसणारी नेता म्हणजे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता.
जयललिता जेव्हाही कोणत्या दौऱ्यावर असतात तेव्हा त्यांची आवडती खूर्चीही त्यांच्या सोबत असते. नुकत्याच जयललिता केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना भेटल्या. जयललिता भेटीसाठी येताच त्यांच्या मागे त्यांची खूर्ची सुद्धा North Blockला पोहोचली. भेटीदरम्यान जयललिता आपल्या याच आवडत्या खूर्चीवर बसलेल्या होत्या. ही खूर्ची अरूण जेटलींच्या खूर्चा पेक्षा मोठी आणि आरामदायक होती.
जयललिता राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भेटायला गेल्या... तिथंही त्यांची ही स्पेशल खूर्ची सोबतच... भेटीनंतर ही खर्ची तामिळनाडू भवनात वापस पाठवली गेली.
मिळालेल्या माहितीनुसार जयललिता यांना संधिवाताचा त्रास आहे. म्हणून त्यांच्यासाठी सागवानाची खास खूर्ची डिझाईन करण्यात आलीय. ही खूर्ची दिल्लीतल्या तामिळनाडू भवनात ठेवलेली असते. दिल्लीतील दौऱ्यात जयललिता जिथं-जिथं जातात, तिथं त्याची खूर्चीही सोबत जाते. मग ते विज्ञान भवनमध्ये होणारी मिटींग असो की संसदेची लायब्ररी किंवा राष्ट्रपती भवन...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.