पत्नी जशोदाबेन यांनी मोदींचा वाढदिवस असा केला साजरा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आपल्या पतीचा वाढदिवस साजरा केला. संपूर्ण दिवसभर व्रताचं पालन करत आणि शहरातील १० मंदिरांमध्ये जाऊन मोदींच्या आरोग्यासाठी आणि मोठ्या आयुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

Updated: Sep 18, 2015, 04:16 PM IST
पत्नी जशोदाबेन यांनी मोदींचा वाढदिवस असा केला साजरा... title=

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आपल्या पतीचा वाढदिवस साजरा केला. संपूर्ण दिवसभर व्रताचं पालन करत आणि शहरातील १० मंदिरांमध्ये जाऊन मोदींच्या आरोग्यासाठी आणि मोठ्या आयुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

गुरुवारी ऐन गणेशचतुर्थीच्याच मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. मोदींच्या चाहत्यांनी संपूर्ण देशभर त्यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. 

गुजरातमध्ये ऊंझा इथं आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या मोदींच्या पत्नीनं - जशोदाबेन यांनीही आपल्या पतीचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीनं साजरा केला. यावेळी, त्यांनी आपल्या पतीला एक चिठ्ठीही लिहिली.

'नरेंद्र मोदी हे माझ्यासाठी देवाप्रमाणे आहेत. त्यांच्यासाठीच मी हे व्रत ठेवलंय...' असं यावेळी जशोदाबेन यांनी म्हटलं. शिवाय, गुजरातमध्ये पारंपरिक पद्धतीनं साजरा केल्या जाणाऱ्या 'आनंद नु गरबो'चं आयोजन केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.