नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यात 35-40 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयालनं सर्वपक्षीय बैठक घेतली.
या बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंग, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, भारताच्या लष्करी कारवायांचे महासंचालक रणवीर सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी सर्वपक्षीय नेत्यांना स्ट्राईकबाबत माहिती दिली. गरज पडल्यास पुन्हा हल्ला करु असं रणवीर सिंग यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.