अणू हल्ल्याच्या पाकच्या धमकीवर संरक्षण मंत्री पर्रिकरांचे सडेतोड उत्तर

उरी हल्ल्यानंतर सरकाररकडून एक मोठं वक्तव्य आलं आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे की, जर गरज पडली तर सरकार लष्करी कारवाई करु शकते. पंतप्रधानांचं उरी हल्ल्यावरील वक्तव्य हे नुसतंच वक्तव्य नाही आहे.

Updated: Sep 21, 2016, 11:46 PM IST
अणू हल्ल्याच्या पाकच्या धमकीवर संरक्षण मंत्री पर्रिकरांचे सडेतोड उत्तर title=

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर सरकाररकडून एक मोठं वक्तव्य आलं आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे की, जर गरज पडली तर सरकार लष्करी कारवाई करु शकते. पंतप्रधानांचं उरी हल्ल्यावरील वक्तव्य हे नुसतंच वक्तव्य नाही आहे.

पत्रकारांशी बोलतांना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर पहिल्यांदा खुलेपणाने बोलले. सुरक्षेच्या बाबतीत झालेली चूक देखील त्यांनी स्वीकारली. ज्या चुका झाल्या त्याची चौकशी होईल.

पाकिस्तानच्या अणूबॉम्ब हल्ल्याच्या धमकीवर बोलताना पर्रिकर म्हणाले, पाकिस्तान हा फक्त रिकाम्या भांड्याप्रमाणे आवाज करतोय. कोणत्याही कारणाशिवाय कोणाचेही वक्तव्य सहन केली जाणार नाहीत. असं देखील मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलं.