पद्म पुरस्कार विजेते : नाना पाटेकर, शर्मिला टागोर, द्रविड

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी १०८ मान्यवरांच्या नावांना पद्म पुरस्कारासाठी संमती दिलीय. यामध्ये चार पद्म विभूषण, २४ पद्मभूषण आणि ८० पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 26, 2013, 01:00 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी १०८ मान्यवरांच्या नावांना पद्म पुरस्कारासाठी संमती दिलीय. यामध्ये चार पद्म विभूषण, २४ पद्मभूषण आणि ८० पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पद्म पुरस्कार पटकावणाऱ्यांमध्ये तब्बल २४ महिलांचा समावेश आहे तसंच ११ विदेशी मूळ असलेल्या, अनिवासी भारतीय किंवा मरणोत्तर सन्मानित केल्या गेलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या तब्बल २५ रत्नांचा समावेश आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात या पुरस्कारांचं वितररण राष्ट्रपतींच्या हस्ते होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यंदा ‘भारत रत्न’ या पुरस्कारासाठी कुणाचंही नाव घोषित करण्यात आलेलं नाही.
पद्म पुरस्कारांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. यामध्ये कला क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजे ३४ व्यक्तींना गौरवलं गेलंय. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील १९, शिक्षण किंवा साहित्य क्षेत्रातील १५, चिकित्सा क्षेत्रातील १४, खेळ जगतातील आठ, सामाजिक क्षेत्रातील सहा, व्यापार-उद्योग क्षेत्रातील सात, सिव्हिल सेवेतील दोन तसंच सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीचा पद्म पुरस्कारांमध्ये समावेश आहे. एक नजर टाकुयात या पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावावर...

पद्म विभूषण
रघुनाथ महापात्र, कला क्षेत्र
एस. हैदर, कला क्षेत्र
प्रोफेसर. यशपाल, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्र
प्रोफेसर. नरसिम्ह, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्र

पद्म भूषण
राजेश खन्ना, कला क्षेत्र (मरणोत्तर)
जसपाल सिंह भट्टी, कला क्षेत्र (मरणोत्तर)
मंगेश पाडगावकर, साहित्य
शर्मिला टागोर, कला क्षेत्र
राहुल द्रविड, क्रिकेटर (क्रीडा क्षेत्र)
एम. सी. मेरीकॉम, बॉक्सर (क्रीडा क्षेत्र)
सुशीलकुमार, कुस्तीपटू (क्रीडा क्षेत्र)

रामानायडू डग्गूबाती, कला क्षेत्र
श्रीमती. श्रीराममूर्ती जानकी, कला क्षेत्र
कनक रेळे, कला क्षेत्र
सरोजा वैद्यनाथन, कला क्षेत्र
अब्दुल राशिद खान, कला क्षेत्र
शिवाजीराव गिरधर, सार्वजनिक क्षेत्र

पद्मश्री
विश्वनाथ पाटेकर ऊर्फ नाना पाटेकर, अभिनेता (कला क्षेत्र)
श्रीदेवी, अभिनेत्री (कला क्षेत्र)
रमेश सिप्पी, कला, महाराष्ट्र
गीतकार निदा फाजली, साहित्य – शिक्षण

रितू कुमार, फॅशन डिझायनर
प्रेमलता अग्रवाल, पर्वतरोहण (क्रीडा क्षेत्र)
योगेश्वर दत्त, कुस्तीपटू (क्रीडा क्षेत्र)
एच. एस. गिरिशा, पॅरा अॅथलिट (क्रीडा क्षेत्र)
विजय कुमार, नेमबाज (क्रीडा क्षेत्र)
एन. डिंको सिंह, बॉक्स (क्रीडा क्षेत्र)
बजरंग लाल ताखड, नौका चालक (क्रीडा क्षेत्र)
डॉ. अमित प्रभाकर मायदेव, औषध, महाराष्ट्र
प्रो. कृष्णा चंद्र चुनेकर, औषध, महाराष्ट्र
ब्रह्मदेव राम पंडीत, कला, महाराष्ट्र
सुरेश दत्तात्रय तळवळकर, कला, महाराष्ट्र
अपूर्व किशोर बिर, कला, महाराष्ट्र
सुधा मल्होत्रा, कला, महाराष्ट्र
माहरुख तारापोर, कला, महाराष्ट्र
निलीमा मिश्रा, सामाजिक कार्य, महाराष्ट्र
दीपक फाटक, विज्ञान – तंत्रज्ञान, महाराष्ट्र
प्रो. शरद काळे, विज्ञान – तंत्रज्ञान, महाराष्ट्र
मिलिंद कांबळे, व्यापार – उद्योग, महाराष्ट्र
कल्पना सरोज, व्यापार – उद्योग, महाराष्ट्र
डॉ. राजेंद्र बडवे, औषध, महाराष्ट्र