www.24taas.com,नवी दिल्ली
संसदेचे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात गोंधळानेच झाली. वादग्रस्त `एफडीआय`च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर तृणमुल काँग्रेसने लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
`एफडीआय`बाबत चर्चा करण्याचे आश्वासन संसदेला देण्यात आले होते. मात्र तसे न झाल्याने विरोधकांनी चर्चेची मागणी करीत गोंधळ घातला. तर सरकारने मात्र तत्कालीन सभागृहनेते प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या वक्तव्याला आश्वा्सन मानण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पहिले दोन दिवस संसदेत कोणतेही कामकाज न होण्याची चिन्हे आहेत.
एफडीआयच्या मुद्द्यावरून संसदेद घमासान होण्याची शक्यता होती त्यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज सकाळी सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव केले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झालेला नाही.