मुंबई : विमा ग्राहकांना आता गरज असेल तेव्हा रक्कम काढण्याची अनुमती लवकरच मिळणार आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे यावर कोणताही दंड देखील आकारला नाही जाणार. वीमा कंपनीचे हे नियम लवकरच इरडा लागू करणार आहे.
इरडाच्या एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे की विमा ग्राहकांना १० ते १५ टक्के रक्कम सोडून बाकीची रक्कम काढता येणार आहे. यामुळे पॉलिसी देखील सुरू राहील आणि गरजेच्या वेळी पैसे काढल्यावर कोणताही दंड देखील आकारला जाणार नाही.
विमा कंपनी पॉलिसी काढण्याआधी हा पर्याय ग्राहकांना देईल. पण जर ग्राहकांनी हा पर्याय सुरुवातील निवडला तरच मध्ये कधीही पैसे काढल्यास दंड़ आकारला जाणार नाही.