`एटीएम`मधून फक्त पाच वेळेस मोफत पैसे काढता येणार - `आयबीए`चे संकेत

सर्व एटीएम केंद्रांना सुरक्षारक्षक पुरवण्याच्या बाबतीत इंडियन बॅँक्स असोसिएशननं म्हणजेच आयबीएनं हात वर केलेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या सुरक्षेचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाऊ शकतो, असे संकेत आयबीएनं दिलेत. तरी आरबीआयच्या परवानगीशिवाय अंमलबजावणी करणे, अशक्य आहे.

Updated: Jan 7, 2014, 12:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सर्व एटीएम केंद्रांना सुरक्षारक्षक पुरवण्याच्या बाबतीत इंडियन बॅँक्स असोसिएशननं म्हणजेच आयबीएनं हात वर केलेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या सुरक्षेचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाऊ शकतो, असे संकेत आयबीएनं दिलेत. तरी आरबीआयच्या परवानगीशिवाय अंमलबजावणी करणे, अशक्य आहे.
बंगळूरुमधल्या एटीएम केंद्रामध्ये एका महिलेवर झालेल्या हल्ल्यानंतर एटीएम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

दरमहा सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यासाठी देशातल्या बॅँकाचे ४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे हा खर्च ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याची तयारी आयबीएनं चालवली आहे.ृ
 
आयबीए खालील उपाययोजले असले, तरी आरबीआयच्या परवानगीशिवाय अंमलबजावणी करणे, अशक्य आहे.
*एटीएमचा वापर कमी असलेल्या वेळांमध्ये बंद ठेवणार
*आंतरबॅँकीय व्यवहारांचे शुल्क 15 वरुन 18 होणार ?
*एटीएममधून दरमहा पाच आर्थिक व्यवहार मोफत करण्याची योजना

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.