५००, १००० च्या नोटा रद्द झाल्याने महिलेची आत्महत्या?

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. तेलंगणामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 55 वर्षाच्या शेतकरी महिलेने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय आल्यापासून आपल्याकडे असलेल्या नोटांचं काय होणार याची चिंता त्या महिलेला सतावत होती.

Updated: Nov 10, 2016, 08:02 PM IST
५००, १००० च्या नोटा रद्द झाल्याने महिलेची आत्महत्या? title=

तेलंगणा : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. तेलंगणामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 55 वर्षाच्या शेतकरी महिलेने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय आल्यापासून आपल्याकडे असलेल्या नोटांचं काय होणार याची चिंता त्या महिलेला सतावत होती.

तेलंगणामधील महबुबाबाद येथील शनिगापूरम गावात ही घटना घडली आहे. कंडुकुरी विनोदा आणि तिचा पती उपेन्द्रिया यांनी ३ महिन्यापूर्वी १२ एकर जमीन विकली होती त्याबदल्यात त्यांना 55 लाख रूपये रोख मिळाले होते. त्यांना नवी जमीन खरेदी करायची होती त्यामुळे त्यांनी पैसे बॅंकेत जमा करण्याऐवजी घरात ठेवले होते. 

नोटा रद्द केल्याची बातमी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. महिलेचा मुलगा श्रीनिवास यांनी ही माहिती दिली. महिला ही अशिक्षित होती त्यामुळे नोटा रद्द झाल्याचा नेमका अर्थ त्या महिलेला समजला नसावा. आपल्याकडे असलेली रोकड ही आता वाया जाणार अशी भिती त्या महिलेला आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.