बहराइच, उत्तर प्रदेश: सात जणांनी बहराइच जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या परिसरात मुंबईतील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीय.
पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून आलेल्या 40 वर्षीय महिला रविवारी एका तरुणासोबत आपल्या मामाकडे जात होती. तेव्हा अब्दुल्लागंज जंगलात सात जणांनी तरुणाला मारहाण करून पळवून लावलं आणि महिलेवर सामूहिक बलात्कार केला.
पीडित महिलेनं सोमवारी पोलीस तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी छोटू, गुलाम रसूल, शकील, मसूरे आणि वसीम मुल्ला नावाच्या पाच आरोपींना अटक केलीय. तर दोघांचा शोध घेणं अजून सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.