नवी दिल्ली : दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाला चार वर्ष पूर्ण झाली. धक्कादायक म्हणजे याच दिवशी अशीच एक घटना राजधानीत समोर आली आहे. दिल्लीत मोतीबाग परिसरात एका कारमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली.
तरुणीने कारचालकावर बलात्काराचा आरोप केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कारवर गृहमंत्रालयाचं स्टिकर आढळले आहे. पीडित तरुणी रात्री नऊ वाजता एम्समधून नोएडातील आपल्या घरी परतत होती.
त्यावेळी नराधमाने पीडित तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नराधमाला अटक केली आहे.