गर्भपात करण्यासाठी सर्वोच्च न्ययालयात याचिका

गर्भ सुदृढ नसल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्ययालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबईतल्या एका महिलेनं आपल्या पतीच्या नावाने याचिका दाखल केली आहे. या महिलेचा गर्भ २१ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यामुळे, कायद्याने गर्भपात करता येत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीची आवश्यकता आहे.

Updated: Jan 16, 2017, 11:38 AM IST
गर्भपात करण्यासाठी सर्वोच्च न्ययालयात याचिका title=

नवी दिल्ली : गर्भ सुदृढ नसल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्ययालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबईतल्या एका महिलेनं आपल्या पतीच्या नावाने याचिका दाखल केली आहे. या महिलेचा गर्भ २१ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यामुळे, कायद्याने गर्भपात करता येत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीची आवश्यकता आहे.

गर्भाची वाढ योग्य प्रकारे होत नसल्याचं मुंबईतल्या डॉक्टरांनी सांगितलंय. त्यानुसार यासंदर्भातचा अहवाल तयार करून तो सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. यापूर्वीही एका प्रकरणात गर्भाची वाढ योग्य होत नसल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्ययालयानं गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यासाठी डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयानं तो आदेश दिला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे.