सूर्याच्या कॅचने पाकड्यांची जळफळाट, सिक्स होता की आऊट? साऊथ अफ्रिका मीडियात मोठा राडा

Suryakumar Yadav catch Controversy : सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा कॅच घेतल्यानंतर सामन्याचं पारडं फिरलं. मात्र, याच कॅचवरून सोशल मीडियावर राडा सुरू झालाय.

सौरभ तळेकर | Updated: Jun 30, 2024, 06:48 PM IST
 title=
Suryakumar Yadav catch Controversy

South Africa media on Suryakumar Yadav catch :  टीम इंडियाला विजयासाठी 30 बॉलमध्ये 31 धावा रोखण्याची गरज असताना हार्दिक पांड्याने क्लासेनला तंबूत पाठवलं अन् टीम इंडियाने सुटकेचा श्वास घेतला. सर्वकाही टीम इंडियाच्या बाजूने जात असताना डेव्हिड मिलर मात्र हृदयाचे ठोके वाढवत होता. अशातच हार्दिक पांड्याने मिलरची विकेट घेण्यासाठी गुड लेथ बॉल टाकला अन् मिलरने तो बॉल खणखणीत बॉन्ड्री लाईनच्या दिशेने मारला. बॉल सिक्स जाणार वाटत असताना सूर्यकुमार यादवने चतुराई दाखवली अन् अफलातून कॅच घेतला. सूर्याने कॅच नाही तर वर्ल्ड कप पकडला होता. सूर्याच्या या कॅचची चांगलीच चर्चा झाली. मात्र, अनेकांनी सूर्याचा कॅच आऊट नाही तर सिक्स होता, असं म्हटलं आहे. त्यामुळे आता वाद निर्माण झालाय.

साऊथ अफ्रिकेला अखेरच्या ओव्हरमध्ये 16 धावांची गरज होती. त्यावेळी मिलरने पहिलाच बॉल टोलवला होता. सूर्याने भन्नाट कॅच घेतला अन् सामन्याचं पारडं फिरवलं. अशक्य असा विजय टीम इंडियाच्या वाटेला आला. मात्र, सूर्याने घेतलेला कॅच सिक्स होता, असं पाकिस्तानच्या सोशल मीडियावर ट्रेंड झालं अन् त्यानंतर साऊथ अफ्रिका मीडियाने देखील आऊट नव्हे तर सिक्स होता, असं म्हटलं. सूर्याचा पाय बाऊंड्रीच्या रोपला लागल्याचा त्यांचा दावा केलाय. तर काही आयसीसीच्या नियमांवर देखील त्यांनी बोट ठेवलंय.

खरंच सिक्स होता?

सूर्यकुमार यादवने कॅच घेतल्यानंतर बॉल वरच्या दिशेने थ्रो केला. त्यावेळी त्याने दोनदा पाय आवरतं घेतले. त्यावेळी बॉन्ड्रीची पट्टी हलल्याची दिसली नाही. थर्ड अंपायरने दोन तीन अँगलने चेक करून आऊट असा निर्णय दिला होता. त्यामुळे सोशल मीडिया आणि साऊथ अफ्रिकन मीडियामधील गप्पा निव्वळ तोंडची हवा असल्याचं पहायला मिळतंय. त्यानंतर सूर्याने पुढचं काम सोपं केलं अन् साधा कॅच घेतला. सूर्याचा बॅलेन्स पाहून अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलंय.

दरम्यान, टीम इंडिया बारबाडोसवरुन न्यूयॉर्कसाठी रवाना होईल. मंगळवारी न्यूयॉर्क येथून एमिरेट्स फ्लाइटने दुबईला जाणार आहे. तिथून टीम इंडिया भारतात येईल. बुधवारपर्यंत टीम इंडिया भारतात येऊ शकते. त्यानंतर टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत होणार आहे. मुंबईत मोठी रॅली देखील निघू शकते. त्याचं शेड्यूल अद्याप समोर आलं नाही.