www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आम आदमी या राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन दिवसांपासून वादाची ठिणगी पडली आहे. त्याआधी आपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्या साजिया इल्मी यांना पक्षात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. योगेंद्र यादव हे माझे चांगले मित्र आहेत, असे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाद क्षमण्याची शक्यता आहे.
योगेंद्र यादव आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील पत्रयुध्दाला आता पूर्णविराम मिळणार अशीच काहीशी चिन्हे दिसत आहेत. योगेंद्र यादव यांच्या पत्रांना विचारात घेत अरविंद केजरीवालांनी यादव यांनी केलेल्या सूचना या अत्यंत महत्त्वाच्या व पक्ष हिताच्याच असून, पक्ष त्या सूचनांवर काम करणार असल्याचे ट्विटरवर म्हटले आहे.
योगेंद्र यादव माझे चांगले मित्र असल्याचे देखील केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. पक्षातून सध्या बाहेर गेलेल्या नेत्या साजिया इल्मी यांना देखील परत पक्षात आणण्यासाठीची आवश्यक पावले उचलण्यात येणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. त्यामुळे `आप` दुफळी थांबण्याची शक्यता आहे.
योगेंद्र यादव यांनी त्यांच्या पत्रांमध्ये `आप`च्या घटनेनुसार पक्षाची वाटचाल सुरू नसल्याची आणि इतर पक्षांप्रमाणे `सुप्रिमो` पध्दत पक्षामध्ये बळावत चालली असल्याची टीका केली होती. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. यादव हेही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.