लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर २४ तासांच्या आतच योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादमधील दोन अवैध कत्तलखाने सील केले आहेत.
रविवारी रात्री करेली पोलिसांनी अटाला आणि नैनीतल्या चकदोंदी मोहल्ल्यातल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई केली. उत्तर प्रदेशात २५० च्यावर अवैध कत्तलखाने आहेत. कागदावर हे कत्तलखाने बंद केले असं दाखवण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र रोज शेकडो जनावरांची कत्तल इकडे होत आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी भाजपनं अवैध कत्तलखाने बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी भाजपनं पहिलं पाऊल टाकलं आहे.