योगी सरकारने केलं आयपीएस हिमांशु कुमार यांना निलंबित

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने  जातीयवादच्या आरोपाखाली आयपीएस अधिकारी हिमांशु कुमार यांना निलंबित केलं आहे. हिमांशु कुमार यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने रिपोर्ट पाठवला होता. त्यानंतर हिमांशु कुमार यांना निलंबित केलं आहे.

Updated: Mar 25, 2017, 03:31 PM IST
योगी सरकारने केलं आयपीएस हिमांशु कुमार यांना निलंबित title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने  जातीयवादच्या आरोपाखाली आयपीएस अधिकारी हिमांशु कुमार यांना निलंबित केलं आहे. हिमांशु कुमार यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने रिपोर्ट पाठवला होता. त्यानंतर हिमांशु कुमार यांना निलंबित केलं आहे.
 
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात सरकार बनलं आहे. लखनऊमध्ये पोलीस मुख्यालय तैनात आयपीएस अधिकारी हिमांशु कुमारने डीजीपी ऑफिसवर जातीयवादाचा आरोप लावला होता. त्यांनी म्हटलं होतं की, 'पोलिसांवर मोठा दबाव आहे. सगळे यादव आडनवाच्या पोलिसांमध्ये ट्रान्सफर आणि बदलीची दहशत आहे. 

अनुशासनहीनतेचा आरोप देखील हिमांशु कुमारवर लावण्यात आले आहेत. हिमांशु कुमार यांनी त्यांच्या पत्नीविरोधात दाखल केलेल्या याचिकेत निपक्षपणे चौकशी न झाल्याची आणि त्यांना त्रास दिल्याचा आरोप केला होता. २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हिमांशु यांनी महराजगंज, श्रावस्ती, हापुड, कासगंज, मेनपुरी आणि फिरोजाबाद यासारख्या ६ जिल्ह्याचं एसपी म्हणून काम पाहिलं आहे.