तुमचे केस तुम्हाला 'करोडपती' बनवू शकतात

केस तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकता.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 24, 2016, 07:40 PM IST
तुमचे केस तुम्हाला 'करोडपती' बनवू शकतात  title=

नवी दिल्ली : ज्या केसांना आपण रोज आरशासमोर विंचरत असतो. वेगवेगळ्या स्टाईल्स करत असतो. ते केस किती महाग आहेत ? तुम्हाला माहित आहे.

केसांवर आपण किती तरी खर्च करतो पण तेच केस तुम्हाला देखील पैसे मिळवून देऊ शकता. केसांचा देखील कोटींचा व्यवहार केला जातो. जमशेदपूरमध्ये महिला केस खरीदी करण्यासाठी येतात. या केसांची किंमत असते १०० ते १३० रूपये १०० ग्रॅम.

केस गोळा केल्यानंतर याच महिला हे केस १५०० ते १६०० रुपये किलोने विकतात. त्यानंतर मुंबई , कोलकाता ऐथून काही व्यापारी येथे येऊन हे केस घेऊन जातात.

व्यापारी १५०० ते १६०० किलोने हे केस विकत घेऊन जातात. काही ठिकाणी तर या केसांच्या बदल्यात भांड देखील दिलं जातं. कमीत कमी ९ इंचचे केस हे लोक विकत घेतात.