नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा अमित शहा यांची फेरनिवड झाली आहे. अमित शहा यांची भाजप अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर त्यांच्यावर पक्षातील नेत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याने, त्याची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. अमित शहा यांच्यासमोर आगामी राज्याच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
भाजप मुख्यालयासमोर सकाळपासून अमित शहा यांचे अभिनंदनाचे फलक झळकत होते. भाजपच्या अध्यक्षपदाची निवडणुकीची प्रक्रिया २० जानेवारीपासून कार्यान्वित करण्यात आली होती. त्यानुसार आज अध्यक्षपदाची निवड करण्यात आली.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची फेरनिवड