www.24taas.com, मोक्सिको
भाषा म्हटलं की ती मग कोणतीही असो, प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान हा असतोच. पण आता जर आपल्या भाषा मृत होत असतील तर काय करायचं? अशी चिंता अनेकांना पडली आहे. त्यामुळेच आता साऱ्यासाठी गुगलने पुढकार घेण्याचे ठरविले आहे. जगभरात तब्बल ७००० हून अधिक भाषा बोलल्या जातात. मात्र येत्या काही वर्षात ३००० हून अधिक भाषा मृत होणार आहेत.
भाषिक समुदायाचे स्थलांतरण अथवा आर्थिक विस्तारीकरणास भाषा उपयोगी पडत नसल्यामुळे असंख्य लोक आपली मूळ भाषा विसरत चालले आहेत. पर्यायाने अनेक बोली नामशेष होत आहेत. या विविध भाषा जतन करण्यासाठी ‘गुगल’ने योजना आखली आहे. लोकांनी आपल्या भाषेतील साहित्य, गाणी गुगलद्वारे शेअर करावीत.
नष्ट होत चाललेल्या भाषा जतनासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुगलचे मेक्सिको मार्केटिंग प्रमुख मिग्युएल अल्बा यांनी केले आहे. अमेरिकेतील नाव्हजो, स्पेनमधील ऍरॉगॉनीज, हिंदुस्थानीतील कोरो आणि टांझानियातील बुरूंगी या भाषा अत्यंत अल्प लोक बोलतात या भाषा जतन करायला हव्यात.