ऑस्ट्रेलियात पुन्हा भारतीय 'टार्गेट'

ऑस्ट्रेलियात पुन्हा भारतीय 'टार्गेट' होऊ लागलेत. गुरुवारी रात्री एका भारतीय (22) टॅक्सी चालकावर चार व्यक्तींनी हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण केली.

Updated: Dec 2, 2011, 10:51 AM IST

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

 

ऑस्ट्रेलियात पुन्हा भारतीय 'टार्गेट' होऊ लागलेत. गुरुवारी रात्री एका भारतीय (22) टॅक्सी चालकावर चार व्यक्तींनी हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण केली.

 

 

भारतीय वंशाच्या व्यक्तींना ऑस्ट्रेलियात वाईट वागणूक मिळण्याचे प्रसंग सतत आपल्या कानावर पडत असताना, असाच प्रसंग गुरुवारी पुन्हा घडला. या भारतीय व्यक्तीचे नाव रविशेर सिंग आहे. हल्ला करणाऱया चार जणांचा सिंग यांच्याशी वाद झाल्याने, त्यांनी सिंग यांना मारहाण केली. या चारपैकी तीन जणांना अटक करण्यात आली  आहे.

 

चौघेजण मेंटॉन हॉटेल येथे त्यांच्या टॅक्सीत चढले. सिंग यांना त्यांनी चेलसिया हाईट्स हॉटेल येथे घेऊन जाण्यास सांगितले. एका पबपाशी टॅक्सी पोचल्यानंतर या चार जणांनी सिंग यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. तेव्हा सिंग टॅक्सीतून खाली उतरले. त्यावेळी या चौघांनी सिंग यांनी डोक्यावर घातलेली पगडी हिसकावून घेतल्यानंतर बेदम मारहाण केली.