स्वच्छ देशांच्या यादीत भारत ९५ वा

स्वच्छ देशांच्या यादीत भारत ९५ व्या क्रमांकावर आहे. तर गेल्यावर्षीच्या क्रमांकापेक्षा ११ क्रमांकांनी भारत खाली गेलाय.

Updated: Dec 2, 2011, 10:57 AM IST

झी २४ तास वेब टीम, न्यूयॉर्क

 

भारतीयांसाठी एक धक्कादायक बातमी. देशात भ्रष्टाचार विरोधी वारे वाहू लागलेले असताना भ्रष्टाचाराचा निर्देशांक दर्शवणा-या यादीत भारताचं स्थान यंदा तळाला गेल्याचं पाहायला मिळालं.

 

ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेनं यंदा १८३ देशांचा अभ्यास करुन एक यादी जाहीर केलीये. स्वच्छ देशांच्या यादीत भारत ९५ व्या क्रमांकावर आहे. तर गेल्यावर्षीच्या क्रमांकापेक्षा ११ क्रमांकांनी भारत खाली गेलाय.

 

विविध प्रकारची १७ सर्वेक्षणं, तसचं संबंधीत देशांमध्ये भ्रष्टाचार निर्मुलनाचे कायदे, सामान्य माणसाला माहितीची उपलब्धता किती सहज आहे या निकषांचा विचार करून तयार केलेल्या या यादीत भारत चक्क ९५ व्या स्थानावर आहे. स्वच्छ देशांच्या यादीत पहिल्या स्थानी न्यूझीलंड, दुस-या स्थानी डेन्मार्क या देशांचा समावेश आहे.