कुराणाचा अपमान; व्यक्तिला जिवंत जाळलं

कुराणाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका मानसिक विकृती असलेल्या व्यक्तिला जिवंत जाळण्याची घटना पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये घडलीय. या कृत्यात एका-दुसरी व्यक्ती सहभागी नव्हती तर पंजाब प्रांतातील हजारो लोकांनी एकत्र येऊन हे कृत्य केलंय. पोलिसांनी या घटनेची माहिती दिलीय.

Updated: Jul 5, 2012, 11:59 AM IST

www.24taas.com, लाहोर  

कुराणाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका मानसिक विकृती असलेल्या व्यक्तिला जिवंत जाळण्याची घटना पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये घडलीय. या कृत्यात एका-दुसरी व्यक्ती सहभागी नव्हती तर पंजाब प्रांतातील हजारो लोकांनी एकत्र येऊन हे कृत्य केलंय. पोलिसांनी या घटनेची माहिती दिलीय.

लाहोर पासून 400 किलोमीटर अंतरावर स्थित बहावलपूर जिल्ह्यातील जवळजवळ 2000 लोक एकत्र जमले होते. एका मानसिक विकृतीचा शिकार असलेल्या व्यक्तिला शिक्षा करण्यासाठी हे सगळे एकत्र आले होते. पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या व्यक्तीनं मुस्लिम पवित्र ग्रंथ ‘कुराणा’ची काही पानं जाळली होती. ही बातमी लोकांना कळताच त्यांना रागाला आवरता येणं अशक्य झालं. लोकांचा अनावर झालेला राग पाहून पोलिसांनी या व्यक्तिला ताब्यात घेतलं. पण, एवढ्यानं जमाव काही शांत झाला नाही.

या 2000 जणांच्या जमावानं बळाच्या साहाय्यानं तथाकथित आरोपीला तुरुंगाच्या बाहेर काढलं आणि बदड-बदड बदडलं. यावेळी जमावानं पोलिसांचीही दोन वाहनं जाळली. पोलीस स्टेशनलाही आग लावण्याचा प्रयत्न झाला. एवढ्यानंच त्यांचा राग शांत झाला नाही. यानंतर या जमावानं त्या व्यक्तिला जिवंत जाळलं. ही व्यक्ती एक मलंग वैरागी होती.