झी २४ तास वेब टीम, इस्तंबूल
तुर्कस्तानात आलेल्या ७.२ तीव्रतेच्या भूकंपामुळे १३८ पेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती तुर्कस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री इद्रिस नईम सहिन यांनी आज दिली.
दरम्यान, शेकडो नागरिक बेपत्ता असून माती-सिमेंटच्या ढिगाऱ्यांखाली त्यांचा शोध घेणे सुरू आहे.२४ तास मदत कार्य सुरू ठेवण्यात आले आहे.
इर्सिस प्रांतातील मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी सहिन आले होते. इर्सिस शहरात ६० जणांचा मृत्यू झाला आहे तर व्हॅन सिटीमध्ये ढिगाऱ्यांखाली १०० मृतदेह सापडले आहेत. १०९० नागरिक जखमी झाल्याची माहिती कालपर्यंत समजली आहे, असे ते म्हणाले