निकोलस सार्कोझी यांचे भवितव्य पणाला

फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निकोलस सार्कोझी यांचे भवितव्य पणाला लागले आहे.

Updated: Apr 23, 2012, 01:31 PM IST

www.24taas.com, पॅरिस

 

 

फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निकोलस सार्कोझी यांचे भवितव्य पणाला लागले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला रविवारी सुरूवात झाली. निकोलस दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत.

 


देशाची अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी यामुळे फ्रान्सची जनता नाराज असल्याने विद्यमान अध्यक्ष सार्कोझीना त्याचा फटका निवडणुकीत सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सहा मेला होणा-या निवडणुकीसाठी सार्कोझी आणि सोशालिस्ट विचारसरणीचे फ्रांकोईस होलेंड या दोंघामध्ये चुरस रंगेल अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.

 

 

या निवडणुकीचे संपूर्ण युरोपवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या विजयावर त्यानंतर महिन्याभरात होण्यात फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.