मालदीवमध्ये पुन्हा हिंसाचार

मालदीवमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला आहे. याला निमित्त होते ते राष्ट्रपती मोहम्मद वहीद मजलिस यांचे भाषण. या हिंसाचारामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशिद यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच हल्ला केल्याने वातावरण बिघडले आहे. पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले आहे.

Updated: Mar 2, 2012, 12:05 PM IST

www.24taas.com, माले

मालदीवमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला आहे. याला निमित्त होते ते राष्ट्रपती मोहम्मद वहीद मजलिस यांचे भाषण. या हिंसाचारामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशिद यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच हल्ला केल्याने वातावरण बिघडले आहे. पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले आहे.

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद वहीद मजलिस यांचे संसदेच्या अधिवेशनात भाषण सुरू होताच तेथे हिंसा भडकली. यातून संसदही सुटली नाही.  नाशिद यांच्या समर्थकांनी पोलिसांवर हल्ला करत राष्ट्रपतींच् भाषण  रोखले. त्यामुळे  नाशिद यांचा छोटा भाऊ नाजिम सत्तार यांना १७ समर्थकांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वहीद आज संसद भवनमध्ये पोचण्यापूर्वीच नाशिद यांच्या मालदीवियाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी त्यांची खुर्ची तसेच त्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या खुर्च्या हटविल्या आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना घोषणाबाजी केली.

पीपल्स मजलिस (संसद)च्या आत आणि बाहेर पोलीस दलांना तैनात करण्यात आले होते. मात्र, काही निदर्शकांनी अडथळे तोडताना सुरक्षा विभागात घुसखोरी केली. निदर्शकांनी दगडफेक केल्यामुळे काही पोलीस अधिकारी जखमी झालेत. यावेळी काही दुकानांची मोडतोड करण्यात आली. माजी राष्ट्रपती नाशिद यांनी राजीनामा दिल्यानंतर सुमारे महिनाभरातच संसदेचे अधिवेशन सुरू होणार होते. नाशिद यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती वहीद यांना राष्ट्रपती बनविण्यात आले होते.