मिट रोमनेंचा कॉकसेसमध्ये सलग चवथा विजय

मिट रोमने यांनी वॉशिंगटन कॉकसेसमध्ये जिंकत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. पक्षाचे राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी नामांकनाच्या स्पर्धेत दहा राज्यात होणाऱ्या सुपर ट्युसडे लढतींच्या आधी रोमने यांनी आपली घोडदौड पुढे चालु ठेवली आहे

Updated: Mar 4, 2012, 03:41 PM IST

www.24taas.com, वॉशिंगटन

 

 

मिट रोमने यांनी वॉशिंगटन कॉकसेसमध्ये जिंकत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. पक्षाचे राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी नामांकनाच्या स्पर्धेत दहा राज्यात होणाऱ्या सुपर ट्युसडे लढतींच्या आधी रोमने यांनी आपली घोडदौड पुढे चालु ठेवली आहे. रोमने यांनी रोन पॉल आणि रिक सॅनटोरम यांच्या पेक्षा ३७ टक्क्यांनी आघाडी घेतली आहे, या दोघांना प्रत्येकी २४ टक्के मत मिळाली तर गिंगररिच यांना अवघी ११ टक्के मतं मिळाल्याने ते चवथ्या क्रमांकावर फेकले गेले. रोमने यांनी याआधी आपलं होम स्टेट मिशिगन आणि अरिझोनात विजय मिळवला होता आणि त्याआधी मैन कॉकसेसही जिंकली होती.

 

आता सगळ यांचे लक्ष मार्च सहा रोजी होणाऱ्या सुपर ट्युसडे कडे लागलं आहे. दहा राज्यांमध्ये होणाऱ्या प्रायमरीत रोमने यांनी विजय प्राप्त केल्यास त्यांचे नामांकन निश्चित होणार आहे. रोमने यांनी आतापर्यंत न्यू हँम्पशायर, फ्लोरिडा, नेवाडा, मैन, मिशिगन, अरिझोना आणि वॉशिंगटनमध्ये विजयाची नोंद केली आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या विरोधात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत रोमने आघाडीवर आहेत.