www.24taas.com, झी मीडिया, लंडन
पृथ्वी नष्ट होण्याचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यासाठी पाणी आणि वातावरणातील बदल पूर्णपणे जबाबदार आहे.
एका संशोधनात मिळालेल्या माहितीनुसार अंटार्क्टिकामध्ये जमिनीच्या पातळीपासून खाली वाहत असलेल्या हिमनद्या खूप गतीनं वितळतायेत. न्यूकैस्टल विद्यापीठाच्या जिओ फिजिकल जिओडेसीचे प्राध्यापक पीटर क्लार्कनं सांगितलं की अंटार्क्टिकामध्ये पृथ्वीच्या आत इतकं मोठं परिवर्तन हे अभूतपूर्व आहे.
जी सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे, बर्फ वितळण्याचा परिणाम पृथ्वीच्या आत 400 किलोमीटर खाली असलेल्या दगडांवर पडतोय. अंटार्क्टिकामधील जमिन यात जास्त प्रभावाखाली आलीय. तिथं हे दिसून पडतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.