तिच्या धाडसानं रचला देशात नवा इतिहास...

सौदी अरेबच्या एका १७ वर्षीय मुलीनं साहस दाखवत ९० वर्षांच्या म्हाताऱ्याचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावलाय. यापेही उल्लेखनीय गोष्ट म्हणजे न्यायालयानंही याच मुलीची बाजू घेत निर्णयही तिच्याच बाजुनं दिलाय. एका कट्टर मुस्लिम देशात या पद्धतीचा निर्णय म्हणजे काही छोटी गोष्ट नक्कीच नाही. 

Updated: Nov 15, 2014, 03:14 PM IST
तिच्या धाडसानं रचला देशात नवा इतिहास...  title=

नवी दिल्ली : सौदी अरेबच्या एका १७ वर्षीय मुलीनं साहस दाखवत ९० वर्षांच्या म्हाताऱ्याचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावलाय. यापेही उल्लेखनीय गोष्ट म्हणजे न्यायालयानंही याच मुलीची बाजू घेत निर्णयही तिच्याच बाजुनं दिलाय. एका कट्टर मुस्लिम देशात या पद्धतीचा निर्णय म्हणजे काही छोटी गोष्ट नक्कीच नाही. 

स्थानिक वेबसाईट ‘सबक’नं दिलेल्या माहितीनुसार, आपल्याचं बापानं आपल्याशी खोटं बोलून एका ९० वर्षीय म्हाताऱ्याशी आपल्या लग्नाचा घाट घातल्याचं समजल्यानंतर या मुलीच्या पायाखालची जमीनंच सरकली. पण, तिला हे मंजूर नव्हतं... त्यामुळे, तिनं न्यायालयाकडे धाव घेतली. 

एका २० वर्षीय तरुणाचा फोटो दाखवून तिच्या जन्मदात्यानंच हा लग्नाचा घाट घातला होता. पण, नंतर जेव्हा लग्नाची कागदपत्रं आली तेव्हा तिला समजलं की तिचं लग्न एका तरुणाशी नाही तर मदीना शहरात राहणाऱ्या एका ९० वर्षीय म्हाताऱ्याशी होतंय.  

त्यानंतर, या मुलीनं धाडस दाखवत पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सगळं सत्य समोर आलं. 

त्यानंतर या मुलीनं आपल्या बापालाही सरळ सांगून टाकलं की मी घर सोडेन पण हे लग्न करणार नाही. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं... इथं न्यायाधीशांनी मुलीच्याच बाजुनं निर्णय दिला. 

सोशल मीडियामध्ये आपल्या मुलीलाच विकणाऱ्या बापावर टीकाही होतेय. तर या धाडसी मुलीवर कौतुकाचा वर्षाव होतोय... कारण, आत्तापर्यंत असं इथं कधी घडलंच नव्हतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.