www.24taas.com, बगदाद
इराकमध्ये आतंकवाद प्रकरणी 21 लोकांना फाशी देण्यात आलं. या 21 जणांमध्ये 3 स्त्रियांचाही समावेश आहे. या सर्व लोकांना एकाच दिवशी फाशी देण्यात आले.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकारच्या अध्यक्षांकरवी ही फाशी थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत इराकच्या सरकारने फाशीचा निर्णय बदलला नाही. त्यामुळे इराकमध्ये आतंकवाद पसरवणाऱ्या लोकांना माफी न देता फाशीच देण्यात आले.
इराकच्या न्याय विभागाचे अधिकारी हैदर अल सादी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं, न्याय मंत्रालयाने 21 आतंकवाद्यांना पकडण्यात आलं होतं. यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यावर त्यांना इतर कुठलीही शित्क्षा न देता थेट फाशईची शिक्षाच देण्यात आली. या 21 जणांमध्ये 3 महिलांचाही समावेश होता.