२१वे शतक हे आशियाचे : नरेंद्र मोदी

 भारत आणि आसिआन हे नैसर्गिक भागीदार आहेत. तसेच २१वे शतक हे आशियाचे आहे. आता आपल्याला बदलासाठी सुधारणा करायची आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालांपूर येथील आसिआन शिखर संमेलनात केले.

PTI | Updated: Nov 21, 2015, 10:36 AM IST
२१वे शतक हे आशियाचे : नरेंद्र मोदी title=

क्वालालांपूर : भारत आणि आसिआन हे नैसर्गिक भागीदार आहेत. तसेच २१वे शतक हे आशियाचे आहे. आता आपल्याला बदलासाठी सुधारणा करायची आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालांपूर येथील आसिआन शिखर संमेलनात केले.

पंतप्रधान मोदी आजपासून मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर आहेत. मोदी आज सकाळी मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये दाखल झालेत. यावेळी त्यांनी चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेदरम्यान व्यापार व अन्य काही विषयांवर चर्चा झाली.

या दौऱ्यांमध्ये दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) तेराव्या शिखर परिषदेला उपस्थितीती लावली. तर दहाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला मोदी उपस्थित राहणार आहेत.  

भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूती येत असून, कृषी क्षेत्रच आमचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. कराच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे. रुपयाचे मूल्य स्थिरावले आहे. देशांतर्गात उत्पन्नात वाढ झालेय. व्याजदरांत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे मोदी म्हणालेत.

भारतात परकीय गुंतवणुकीला चालना दिली आहे. पाच कोटी पक्की घरे बांधण्याचे उद्दीष्ट आहे. भारतात रस्त्यांचा विकास झपाट्याने होत असून, सध्या दररोज १४ ते २३ किमी अंतराचे महामार्ग बांधण्यात येत आहेत. परकीय गुंतवणुकीला भारतात आणण्यासाठी मी येथे आलोय, असे मोदीनी स्पष्ट केले.

 मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

 - भारताला वैश्विक निर्मिती केंद्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे.
- परदेशी गुंतवणुकीत ४० टक्के वाढ झाली.
- विकासासोबत महागाई कमी झाली, १८ महिन्यातच अर्थव्यवस्था सुधारली. जनधयोजनेअंतर्गत एका वर्षात १९ कोटी बँक खाती झालीत.
- फक्त सुधारणा करणे हेच आमचे लक्ष्य नाही, तर बदल घडवून आणणे हे आमचं उद्दिष्ट आहे.
- आर्थिक संकेतांनुसार, पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.
- जागतिक अर्थव्यवस्था सध्या बिकट आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचे यश हे चांगल्या नीतींचे मिळालेले फळ आहे
- आपल्याला बदलासाठी सुधारणा करायची आहे.
- आशियाई देशांची कामगिरी चांगली आणि उल्लेखनीय आहे.
- २१ वे शतक हे आशियाचे आहे.
- भारत आणि आसिआन नैसर्गिक भागीदार आहेत - नरेंद्र मोदी
- क्वालालांपूर येथील आसिआन शिखर संमेलन सुरू

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.