आरोपी तहव्वूर राणाला १४ वर्ष शिक्षा

तहव्वूर राणाला शिकागो कोर्टानं १४ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. डेनमार्कमधील दैनिकावर दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असल्याप्रकरणी राणाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Updated: Jan 18, 2013, 08:34 PM IST

www.24taas.com, शिकागो
तहव्वूर राणाला शिकागो कोर्टानं १४ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. डेनमार्कमधील दैनिकावर दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असल्याप्रकरणी राणाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवाय पाकिस्तानातल्या लष्कर-ए-तोयबाला मदत केल्याचा ठपकाही राणावर ठेवण्यात आला आहे.
तहव्वुर राणा हा दहशतवादी डेव्हिड हेडलीचा साथीदार आहे... राणाच्या खराब तब्येतीमुळं त्याला ९ वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी त्याच्या वकीलांनी केली होती.. तर अमेरिकन वकीलांनी त्याला ३० वर्षाच्या शिक्षेची मागणी केली होती. २००९ साली राणाला मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

मात्र त्याची या आरोपातून मुक्तता करण्यात आली. मुंबई हल्ल्यात राणा सामील असल्याचा आरोप भारतीय तपासयंत्रणांनी केला असून त्यांची याप्रकरणी दुसऱ्यांदा चौकशीची मागणीही केली आहे.