आयसिसच्या निशाण्यावर २८५ भारतीय

आयसिसच्या निशाण्यावर 285 भारतीय असल्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहिती मिळाली आहे. लोन वोल्फ हल्ला करुन आयसिस सगळ्यांना टार्गेट करण्याची चिन्हं आहेत. आयसिस समर्थित युनायटेड कॅलिफॅटनं जगभरातल्या 4 हजार लोकांना मारण्याचा प्लान बनवला आहे. यांत भारतातल्या २८५ जणांचा समावेश आहे.. यातील सगळ्यात जास्त व्यक्ती या सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहेत. 

Updated: Jun 26, 2016, 10:05 PM IST
आयसिसच्या निशाण्यावर २८५ भारतीय title=

नवी दिल्ली : आयसिसच्या निशाण्यावर 285 भारतीय असल्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहिती मिळाली आहे. लोन वोल्फ हल्ला करुन आयसिस सगळ्यांना टार्गेट करण्याची चिन्हं आहेत. आयसिस समर्थित युनायटेड कॅलिफॅटनं जगभरातल्या 4 हजार लोकांना मारण्याचा प्लान बनवला आहे. यांत भारतातल्या २८५ जणांचा समावेश आहे.. यातील सगळ्यात जास्त व्यक्ती या सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहेत. 

आयसिसच्या या यादीत या सगळ्या व्यक्तींची नावं, वैयक्तीक माहिती आणि मोबाईल नंबरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जगभरातल्या नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठीच आयसिसनं हा मोठा प्लान आखला आहे.