अघटित: ४००० वर्षं जुन्या ममीने केली हालचाल!

मँचेस्टरच्या म्युझियममध्ये एक चमत्कार घडला आहे. ४००० वर्षांपूर्वीच्या एका ममीने अचानक हालचाल केली आहे. या गूढ घटनेमुळे जगभरातल्या पुरातत्ववेत्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 24, 2013, 07:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
मँचेस्टरच्या म्युझियममध्ये एक चमत्कार घडला आहे. ४००० वर्षांपूर्वीच्या एका ममीने अचानक हालचाल केली आहे. या गूढ घटनेमुळे जगभरातल्या पुरातत्ववेत्त्यांमध्ये खळबळ माजली आहे. गेल्या ८० वर्षांपासून या म्युझियममध्ये असणारी ही ममी अचानक आपल्या जागेवरून हालली आहे.
लंडनच्या म्युझियममध्ये १० इंच उंचीची नेब-सेनू नामक एक गूढ ममी आहे. ही ममी इ.स.पू. १८०० वर्षं जुनी आहे. ही ममी शापित आसल्याची दंतकथा आहे. आश्चर्य म्हणजे ही ममी अचानक १८० अंशांमध्ये फिरली आहे. या ममीच्या जवळपास कुणीही फिरकलं नसताना अचानक ही ममी हालल्यामुळे सगळेच संभ्रमात आहेत.
म्युझियममधल्या सीसीटीव्ही फुटेज पाहून म्युझियमचे प्रमुखही हादरले आहेत. या ममीजवळ कुणीही नसताना अचानक या ममीने स्वतःहून १८० अंशात गिरकी घेतलेली सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं आहे. म्युझियमला भेट देणाऱ्या लोकांच्या दिशेने अचानक ही ममी वळली आहे. जगातील आश्चर्यकारक घटनांचं शुटिंग करणारी एक वाहिनी या ठिकाणी दाखल झाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पुनःपुन्हा तपासण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.