www.24taas.com, झी मीडिया, प्रिटोरिया
रंगभेदविरोधी चळवळीचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.
प्रिटोरियाच्या मेडीक्लिनिक हॉस्पिटलमधे नेल्सन मंडेला यांना दाखल करण्यात आलं होतं. फुफ्फूसांना झालेल्या जंतूसंसर्गानं गेले काही महिने ते आजारी आहेत. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा आणि सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचे नेते सिरील रामाफोसा यांनी यांनी काल हॉस्पिटलमधे जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. ८ जूनला प्रिटोरियाच्या मेडीक्लिनिक हॉस्पिटलमधे मंडेला यांना अॅडमिट करण्यात आलंय. गेल्या २४ तासांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक अवस्थेत पोहोचलीय. मंडेला यांच्याम प्रकृतीबाबत त्यां ची पत्नी ग्रॅसा मॅशेल यांनाही माहिती देण्यात आलीय.
दक्षिण आफ्रिकेमधील श्वेतवर्णी राजवटीविरोधात मंडेला यांनी प्रदीर्घ लढा दिला होता. अनेक दशकांचा तुरुंगवास भोगून बाहेर पडल्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती झाले होते. मंडेला हे देशाचे प्रथम कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष ठरले होते. १९९३ मध्ये मंडेला यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.