आनंदोत्सव | ही मुलं देवा घरची 'पिवळी फुलं'

इंग्लंडमधील बर्मिंघहॅम शहरात एक लहानगी अनू, निरागसपणे आपला कृत्रिम पाय, सर्व वर्ग मैत्रिणींना दाखवते, आणि निरागस मैत्रिणींच्या चेहऱ्यावर खरंखुरं निरागस हास्य खुलतं. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 6, 2017, 05:07 PM IST

बर्मिंघहॅम : इंग्लंडमधील बर्मिंघहॅम शहरात एक लहानगी अनू, निरागसपणे आपला कृत्रिम पाय, सर्व वर्ग मैत्रिणींना दाखवते, आणि निरागस मैत्रिणींच्याही चेहऱ्यावर, निरागस हास्य खुलतं.

हा ४२ सेंकदाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय, या व्हिडीओत फक्त पाहण्यासारखं काही असेल, तर निरागस हास्य,  आणि आनंद...येथे दु:खाला कुठेही थारावारा नाहीय. एक क्षण या शाळेच्या अंगणात निरागस पिवळी फुलं फुलल्यासारखंच तुम्हाला वाटेल.

ही मुलं देवा घरची पिवळी फुलं

हा आनंद वर्ग मैत्रिणी शाळेच्या मैदानात एकमेकांना अलिंगन देऊन, मिठी मारून व्यक्त करतात, आता अनु आपल्यासोबत एका तालात पाऊल टाकेल, हातातून हात सुटून गेल्यानंतर कुणीतरी पुन्हा धावून आपल्याबरोबर आल्याचा आनंद या मुलींना झाला आहे.

कदम कदम बढाऐ जा....

एका लहानगीला कृत्रिम पाय लावल्याचं दु:ख हा व्हिडीओ पाहून होत नाही, तर अनुच्या चेहऱ्यावर आपल्याला पुन्हा पाय मिळाला, मोठा आधार मिळाला याचं समाधान आहे. जणू काही ती म्हणतेय, पाया आता मी ही तुमच्या बरोबर एका तालात एका सुरात चालणार.

अनुच्या जन्मानंतर काही वेळाने, तिचा उजवा पाय कापावा लागला होता. आपल्या मित्रांना एक प्रेरणा देणारा हा व्हिडीओ नक्की दाखवा. व्हिडीओ पाहणारा त्याचं दु:ख विसरून नक्कीच प्रेरणा घेईल.