www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या न्यूजर्सी येथील नौसेनेच्या केंद्रात मंगळवारी झालेल्या स्फोटात आठ लोकं जखमी झाल्येत.या भयंकर स्फोटात घायाळ झालेल्यापैकी एक गंभीर जखमी असून स्फोटाचं कारण शोधलं जातय.
स्फोटानंतर येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असे नौसनेचे प्रवक्ते माईक ब्राडी यांनी सांगितले. या घटनेचा तपास सुरू असून कोणत्या कारणामुळे स्फोट झाला अथवा करण्यात आला आहे का, याचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, काही लोकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
या स्फोटातील गंभीर जखमीला स्थानिक रू्ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे केवळ बोटहाऊस परिसरात नुकसान झाले आहे. घटना घडली तेथील संरक्षण केंद्राचे काहीही नुकसान झालेले नाही, असे नौसेनेने स्पष्ट केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.