www.24taas.com,झी मीडिया,लंडन
आयर्लंडमध्ये गर्भपाताचा कायदा नसल्यामुळे गेल्या वर्षी भारताची सविता हलप्पनवार हिला जीव गमवावा लागला होता. याच धर्तीवर आयर्लंडच्या संसदेमध्ये काल या गर्भपात कायद्याला अनुमती देण्यात आलीय. शुक्रवारी संसदेमध्ये या कायद्यासाठी मतदान करण्यात आलं ज्यात बहुमताने हा कायदा संमत झाला.
आयर्लंडचे पंतप्रधान ऐडा केनी आणि त्यांच्या सरकारकडून गर्भावस्थेतील जीवाच्या सुरक्षेच्या आशयाचे विधेयक सादर करण्यात आले. ज्यात जर गर्भामुळे आईला धोका असेल अथवा मृत्यू होण्याचा संभव असेल तरच गर्भपात करण्यास संमती देण्यात आलीय. संसदेत बऱ्याच वेळ चाललेल्या चर्चेत रात्री उशिरा १२.३० वाजता १२७ मते मिळवून हे विधेयक संमत करण्यात आले. संसदेत मिळालेले बहुमत आणि काही विरोधी नेत्यांनी केलेलं समर्थन यामुळे हा कायदा संमत होऊ शकला. आता वरच्या सदनात या कायद्यावर मतदान होईल आणि तिथेही सत्ता पक्षालाच बहुमत असल्याने हे विधेयकही मंजूर होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गर्भपाताची संमती न दिल्यामुळे भारताची सविता हलप्पनवार हिचा मृत्यू झाला होता. जर योग्य वेळी तिचा गर्भपात केला गेला असता तर नक्कीच सविता वाचू शकली असती, असे तिच्या रिपोर्टमध्ये सांगितले होते. गर्भपाताच्या या कायद्याला मात्र गर्भपातविरोधी संघटनेने विरोध दर्शविलाय. त्यांनी या कायद्याविरोधात आम्ही कोर्टात उभे राहू अशी धमकी दिलीय. याआधी बाळाची जन्माआधीच हत्या होणारा असा कायदा आयर्लंडमध्ये पहिल्यांदाच करण्यात आलाय. संसदेच्या खालच्या सदनात २४ तास चाललेल्या चर्चेत आणखी एक विधेयक संमत करण्यात आल आहे. ज्यात गर्भपातासाठी महिलांना ब्रिटनमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलीय. आयरिशच्य़ा आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गेल्या वर्षी आयर्लंडच्या साधारण ४००० महिलांनी ब्रिटनच्या रुग्णालयात जाऊन गर्भपात केल्याची माहिती आहे. यामध्ये १८ वर्षाखालील १२४ मुलींचा समावेश आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.