इस्त्राइल म्हणजे कँसर- अहमदीनेजाद

“इस्त्राइल देश म्हणजे मानवतेचा अपमान आहे.” असं इराणचे राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी म्हटलं आहे. तसंच इस्त्राइल म्हणजे कँसरची गाठ असून हा कँसर पसरण्यापासून वाचवलं पाहिजे असं अपीलही त्यांनी केलंय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 18, 2012, 11:48 AM IST

www.24taas.com, तेहरान
“इस्त्राइल देश म्हणजे मानवतेचा अपमान आहे.” असं इराणचे राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी म्हटलं आहे. तसंच इस्त्राइल म्हणजे कँसरची गाठ असून हा कँसर पसरण्यापासून वाचवलं पाहिजे असं अपीलही त्यांनी केलंय..
इराणमधील फार्स या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार रमझानच्या शेवटच्या दिवसानिमित्त नमाज पढून झाल्यावर तेहरान विश्वविद्यालयात अहमदीनेजाद यांनी हे वक्तव्य केलंय. रमझानच्या शेवटच्या शुक्रवारला इराणमध्ये कुद्स म्हटलं जातं. हा दिवस पॅलेस्टाइनच्या समर्थनाचा आणि इस्त्राइलच्या विरोधाचा मानला जातो.
अहमदीनेजाद यांनी म्हटलं कुद्स हा दिवस ज्यू समाजाच्या कँसरला समाजात पसरण्यापासून वाचवू इच्छइणाऱ्यांनी एकत्र येण्याचा दिवस आहे.