'कॅप्टन'नं भर मैदानात केलं चिअरगर्लला प्रपोज!

अमेरिकेतील पॉप्युलर स्पोर्ट नॅशनल फुटबॉल लीगमध्ये ‘लाईव्ह’ मॅच दरम्यान एक आगळा-वेगळाच प्रेमाचा प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळाला. फुटबॉलची मॅच सुरु असतानाच भरलेल्या मैदानासमोर एका चिअरलीडरला ‘कॅप्टन’नं प्रपोज केलं...

Updated: Oct 17, 2014, 03:39 PM IST
'कॅप्टन'नं भर मैदानात केलं चिअरगर्लला प्रपोज! title=

न्यूयॉर्क : अमेरिकेतील पॉप्युलर स्पोर्ट नॅशनल फुटबॉल लीगमध्ये ‘लाईव्ह’ मॅच दरम्यान एक आगळा-वेगळाच प्रेमाचा प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळाला. फुटबॉलची मॅच सुरु असतानाच भरलेल्या मैदानासमोर एका चिअरलीडरला ‘कॅप्टन’नं प्रपोज केलं...

त्यामुळेच, ही लवस्टोरी सध्या खूप चर्चेत आलीय. मैदानात मॅच सुरू असताना सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या आणि खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी या मैदानात चीअरलीडर्सही उपस्थित होत्या. यामध्येच होती चिअरगर्ल क्लेअर...

एरिक स्ट्रॉब या तरुणानं भर मैदानात अंगठी काढून गुडघ्यावर बसून क्लेअरला लग्नासाठी प्रपोज केलं... एव्हाना, कॅमेराही या दोघांकडे वळला होता... अचानक, भर मैदानता एरिकला पाहून भांबावलेली क्लेअर मात्र एरिकच्या या प्रपोजमुळे लाजून चूर झाली... या प्रपोजला उत्तर देताना तिनं 'हो' म्हटलं...  आणि मॅच पाहण्यासाठी आलेल्या सगळ्याच प्रेक्षकांनी या नवी जोडीला टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या.

अमेरिकेतील एअर फोर्समध्ये 'कॅप्टन' पदावर काम करणाऱ्याएरिकची पोस्टिंग सध्या मिडल ईस्टमध्ये झालीय. ड्युटीहून सुट्टी मिळाल्यानंतर घरी परतलेल्या क्लेअरनं या खास क्षणासाठी हा क्षण 'खास क्षण' तयारीही केली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.