नवी दिल्ली : बॉस आणि कर्मचारी यांच्यातील संबंध हे तसे चांगले नसतात. मात्र, असा बॉस आहे की, त्याने कर्मचाऱ्यांना चक्क १.५ कोटींचा बोनस दिलाय. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र, हे खरी गोष्ट आहे.
तुर्कस्तानमधील एका टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीईओनी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दीड लाख पाऊंड म्हणजेच दीड कोटी रुपये बोनसच्या रुपात दिले आहेत. तुर्कस्तानमधील सर्वात मोठी ऑनलाईन फूड ऑर्डरिंक सर्व्हिस येमेक्सपेती.कॉमचे सीईओ आणि को-फाऊंडर नेवजात आयदिनने आपल्या कर्मचाऱ्यांना दीड कोटी रुपये बोनसच्या स्वरुपात दिले.
कंपनीचे म्हणणे आहे की, कंपनीला वर काढण्यात कर्मचाऱ्यांचा मोठा हातभार आहे. आयदिनने म्हटले आहे, आमच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ७० हजार ते १.२० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. आमच्या कर्मचाऱ्यांशी आमचा भावनिक संबंध आहे. त्यामुळे कंपनीचा लाभांश कर्मचाऱ्यांना वाटण्यात आलाय. १५ वर्षांपूर्वी म्हणजे २००० मध्ये ५० लाख रुपयांत कंपनी सुरु केली होती. हीच कंपनी दीड कोटी कर्मचाऱ्यांना बोनस देत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.