www.24taas.com, कैरो
लिबीयाच्या बेनगाजी आणि इजिप्तच्या कैरो शहरात अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला. त्यात एका अमेरिकन अधिका-याचा मृत्यू झाला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर बनविण्यात आलेल्या एका चित्रपटावरुन ही हिंसा भडकली. या चित्रपटावरुन जोरदार निर्दशने करण्यात आली. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंटन यानी हल्ल्याचा निषेध केला आहे.
अमेरिकेतील कॉप्टिप ग्रुपने मोहम्मद पैगंबरांवरील या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट इस्लामविरोधी आहे. त्यात पैगंबरांबाबत काही आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये कुराणाच्या प्रति जाळणा-या पादरींचा समावेश आहे.
काल अमेरिकन दूतावासासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. परंतु, निदर्शनाला अचानक हिंसक वळण लागले. निदर्शकांनी दूतावासावर अचानक हल्ला चढविला. निदर्शकांकडे अत्याधुनिक रायफल्स होत्या. त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. त्यात एक अधिकारी ठार झाला. तर एक जण जखमी झाला. दूतावासावर चढून निदर्शकांनी अमेरिकेचा झेंडा फाडून इस्लामशी संबंधित झेंडे लावले.